Skip to main content

Posts

Showing posts with the label Ashram life

तीर्थरूप आजोबा

ह्या गुरुवारी आजोबा गेले . पण काही लोकं असतात ना, जाऊन ही जात नाहीत. ते जीवंत असतात ते, आपल्या विश्वास प्रणलीत, आपल्या सिद्धान्तात, आपल्या विचर सारणीत आणि आपल्या कृतित. आमचे  बेळगावचे गांधी अजोबा त्यातीलच एक. साधारण अशी व्यक्ति न्हवतीच ती. ते देश प्रेम, तो त्याग, ती शिस्त, ते विस्तीर्ण  विचार, तो साधेपणा, ती  प्रगल्भता  - आज एका व्यक्तीत  सापडणं फार दुर्मिळ आहे , जे आजोंबानी त्यांच्या जीवनामधून दर्शवून दिले. माझं सुदैव की मी त्यांची  नातसून  आणी दुर्दैव की आमचा फक्त 8 वर्षाचा सहवास, तो पण जास्त virtual . पण  काही  नाती आशी असतात ना, की त्यांच्या  परिपक्वतेसाठी  काळाची गरज लागत नाही..तसंच काहीतरी आमचं  नातं  होतं . बहुदा आजोबांच्या  संपर्कात  येणाऱ्या  सगळ्यांना  तसेच  वाटत असावे. आजोबा होतेच तेवढे मनमिळाऊ आणि सुलभ.  ह्या लेखात  मी आजोबांच्या सामाजिक  कार्या  बद्द्ल , किंवा त्यांच्या  भूदान चळवळीतील  योगदानाबद्द्ल , किंवा त्यांच्या स्वातंत्र्य लढ्यातील  य...