ह्या गुरुवारी आजोबा गेले . पण काही लोकं असतात ना, जाऊन ही जात नाहीत. ते जीवंत असतात ते, आपल्या विश्वास प्रणलीत, आपल्या सिद्धान्तात, आपल्या विचर सारणीत आणि आपल्या कृतित. आमचे बेळगावचे गांधी अजोबा त्यातीलच एक. साधारण अशी व्यक्ति न्हवतीच ती. ते देश प्रेम, तो त्याग, ती शिस्त, ते विस्तीर्ण विचार, तो साधेपणा, ती प्रगल्भता - आज एका व्यक्तीत सापडणं फार दुर्मिळ आहे , जे आजोंबानी त्यांच्या जीवनामधून दर्शवून दिले.
माझं सुदैव की मी त्यांची नातसून आणी दुर्दैव की आमचा फक्त 8 वर्षाचा सहवास, तो पण जास्त virtual . पण काही नाती आशी असतात ना, की त्यांच्या परिपक्वतेसाठी काळाची गरज लागत नाही..तसंच काहीतरी आमचं नातं होतं . बहुदा आजोबांच्या संपर्कात येणाऱ्या सगळ्यांना तसेच वाटत असावे. आजोबा होतेच तेवढे मनमिळाऊ आणि सुलभ.
ह्या लेखात मी आजोबांच्या सामाजिक कार्या बद्द्ल , किंवा त्यांच्या भूदान चळवळीतील योगदानाबद्द्ल , किंवा त्यांच्या स्वातंत्र्य लढ्यातील योगदानाबद्दल , किंवा त्यांच्या आमदारकी बद्दल काही लिहनार नाही ते भरपुर मीडिया ने कव्हर केले here here. मी ह्या लेखात त्यांच्या सोबत च्या ८ दिवसाच्या आठवणी आणि गमती जमती सांगणार आहे.
चालो पवनार !
आजोबा, विनोबा भावेजींचे अनुयायी असल्यामुळे, त्यांचं वर्ध्याचं पवनार आश्रम हे माहेर घर. वर्षातून ३-४ वेळा आजोबा आश्रमामध्ये राहायला जायचे. तर असेच एके वर्षी , ९३ वर्षांच्या आजोबांबरोबर पवनार ला जायचं माझं ठरलं . फक्त मी आणि अजोबा :) 93 वर्ष ऐकुन चकित होऊ नाका ... काठी वाले, खोकणारे, विसरभोळे , बोबडे अजोबा नहव्ते ते ... ताठ , खंबीर, हसतमुख, निरोगी, स्पष्ट बोलणारे , सुपर हिट आणि फिट अजोबा होते हे. तर खुप वयस्कर माणसा बरोबर प्रवसाची मी जोखीम घेतीये असं वाटत न्हवतं माला. उलट मी खुप जास्ती excited होते.. एखद्या नियोजित सुट्टीतील पेक्षा जस्ती ..कारण माला खत्री होती की हा आगळा वेगाला ज्ञानवर्धक अनुभव असणार आहे . आणि मी चुकीची नहव्ते. खास 8 दिवसांची सुट्टी कढली आणि एका सात्विक ,आध्यात्मिक प्रवासासाठी झाले तयार.
गंतव्य गोंदिया एक्सप्रेस !
गोंदिया एक्सप्रेस मध्ये आमची भेट होणार होती . ते कोल्हापूरहुन निघालेले आणि मी त्यांना पुण्यात भेटणार होते. भेट झाल्या झाल्या ... आजोबानी मला बोगीतील सगळ्या प्रवाश्यांसमोर २०,००० रुपये ठेवायला दिले . मी थोडी थाबकलेली पाहून मला म्हणाले अगं घाबरू नकोस ही सगळी आपलीच लोकं अहेत, वसुधैव कुटुम्बकम आणि वरून त्या सर्वांना हसतमुखाने त्यांनी विचारले काय बरोबर ना ? बोगित बसलेल्या 7-8 जणांनी माना डोलवल्या. प्रवास संपेपर्यंत ती लोकं खरंच आमची झालेली ... कशे ते पुढे बघा आणि आम्ही २०,००० रुपये कशे खर्च केले ते पण सांगणार आहे :)
चरखा प्रकरण
दुपारच्या बारोबर 4 च्या काट्याला आजोबांनी आपल्या एका जुन्या लाल पिश्वीतुन पेटी चरखा कढला आणि सुत कातायला सुरवत केली. त्याच्या जोडीला त्यांच्या खणखणीत आवाजात भजने म्हणायला सुरवात केली. सगळे लोकं एकदम अचंबित. एका ७-८ वर्षाच्या मुलाला त्यांनी हाथ केला, जवळ घेतलं आणि त्याला शिकवायला लागले. अजून 2-3 लोकं शिकयाला उत्सुक होते.. आजोबांनी थोडक्यात सुत कातायचा एक क्रॅश कोर्सच घेतला म्हणायला हरकत नाही . त्या दरम्यान तिकीट चेकर येऊन गेला सूत कातणाऱ्या आजोबांची वार्ता त्याने दुसऱ्या बोग्यांमध्ये पसरवली .. तर भरपूर जाणं आजोबाना बघायला आले . भरपूर जणांनी फोटोस काढले आणि आजोबा जणू प्रसिद्ध सेलिब्रिटी झाले आणि आजोबाना काय , Crowd हॅन्डल करणे नवीन न्हवते ..मग विनोबाजीं चे आणि गांधीजींच्या कथा रंगल्या
आजोबां बद्द्ल एक गोष्ट म्हणजे .. त्यांनी कधीच रेडीमेड कपडे घातले नाहीत .. स्वतः कातलेले सूत खादी भांडार मध्ये देऊन त्याचं जे कपड मिळायचं त्या कापड्ययाचाच कुरता किंवा बंडी ते शिवून घालत.
मुद्रा प्रकरण
चरख्यामुळे बोगीतली लोकं जाम प्रभावित होते . तो पर्यंत त्यांची गीताई वाचनाची आणि मुद्रा ची वेळ झाली . त्यांनी बोगीतल्या सर्व जणांना गीताई चे काही अध्याय वाचून दाखवले. सगळ्यांनी शिस्तीत ऐकली आणि शेवटी आजोबानी सर्वांना हात जोडायला लावून अप्रतिम ईशावास्य ची प्रार्थना म्हणायला लावली. आणि लोकांनी चूप चाप डोळे बंद करून त्यांच्या मागो मग प्रार्थना म्हंटली ही . काय जादू होती त्यांच्यात कोण जाणे. इथं आपली पोरं कधी आपलं ऐकत नाहीत :) एकाने तर ती प्रार्थना लिहून घेतली . मग आजोबानी नेहमी प्रमाणे त्यांच्या सवयी नुसार ६-७ मुद्रा केल्या . काही जणांनी विचारल्यावर आजोबानी त्यांना मुद्रा चे महत्व आणि कुठल्या मुद्रेचे काय फायदे ते पण सांगितले . मग १०० टाळ्या वाजवून त्यांचा क्रियाकलाप संपविला.
ऊन , पाऊस , आनंद , दुःख , कुठे हि असो आजोबानी आपला नित्यक्रम कधीच चुकविला नाही अगदी शेवट शेवट पर्यंत. माझा शेवटचा विडिओ कॉल झाला , ते जायच्या एक दिवस आधी, तेव्हा पण आजोबानी मला टाळ्या आणि मुद्रा करून दाखविली. ग्रेटच. काय सुंदर आठवण आजोबांची !!
आजोबांचं जेवण
बरोबर ७ वाजता ते जेवायचे . जेवायची वेळ झाली, मी प्रवासात काहीतरी छान म्हणून पुऱ्या आणि तळलेले आणलेलं. ते त्यांनी खाल्लं नाही त्यांनी आपले गायीच्या साजूक तुपातील मेथीचे 3 मोठठे पराठे आणि तीळ शेंगदाण्याची चटणी खल्ली.आजोबांच्या आहारावर आणि त्यांनी केलेल्या प्रयोगांवर ... आणखी एक मोठ्ठा लेख होऊ शकतो. त्यांनी आयुष्यभर अपल्या शेतात जे उगवेल तेच खाल्लं आणि त्यावरून जवळ जवळ ६० वर्ष पासून तिखट खाल्लं नाही, मसाले नाहीत, अल्प मीठ आणि तेल नाही सगळं देशी गाईच्या तुपात बनलेल्या सेंद्रिय भाज्या. भरपूर दूध , फळे, ड्राय फ्रुटस आणि बाहेरचं काहीच नाही. बहुदा आजोबांचा आहार दिवेकर, दीक्षितांना पेक्षा सात्विक आणि परिपूर्ण होता :)
जेवणानंतर त्यांनी झोपताना विष्णू सहस्त्रनामं वाचले , प्रार्थना केली, ध्यान केलं , आणि बारोबार ८. ३० च्या सुमारास शांत झोपले
दुसऱ्या दिवशी ट्रेन मध्ये बारोबार पहाटे ४ वाजता उठले . गीताई, ध्यान, मुद्रा, व्यायाम केला
ड्रायफ्रूट्स, दुध , केळी खल्ली आणि खायला देली.
सकाळी पण सुत कातलं ... गांधी विनोबाजींची गाणी म्हंटली.
मनमिळाऊ आजोबा
सकाळी बोगीत अजुन नवीन चेहरे होते . नेहमी प्रमाणे आजोबांना ओळख करुण घ्यायला काही वेळ लागला नाही. त्यात एक शेतकरी होता आजोबांनी त्याला बरीच देशी बियाणांबद्दल महिती दिली . भूदान चळवळी दरम्यान अख्खा भरत फिरल्या मुळे त्यांना ओरिसा च्या कुठल्या गावत कुठल्या प्रकारची केळी उगावत हे ही महित होते .
एक तरूण जळगांव ची मुलगी होती, तीला आणि तिच्या होणाऱ्या नवऱ्याला पवनार आश्रम बद्दल सांगितले . ते दोघं इतके प्रभावित झालेले कि थोड्या दिवसांनी त्या मुलीने फेसबुक वर मला कनेक्ट केला आणि आश्रमाच्या त्यांच्या भेटीचे अनुभव सांगितले.
त्या नांतर त्यानी एक पी. डब्ल्यू. डी. च्या माणसाशी दोस्ती केली त्याचं काम समजून घेतलं आणि त्याला जमीनीत पाणी कसं शोधायचं हे ही सांगितलं. मग त्याच्याकडचा लॅपटॉप पाहून त्यात क्रिकेट चा सामना लावायला सांगितला आणि त्या नंतर त्यांनी जवळ जवळ 1952 चा छत्रपती शिवाजी हा you tube वर पिक्चर ही पाहिला.
सांगण्याचा भवार्थ हा की आजोबा खूप सहज होते , निरागस होते आणि सुलभ होते . ते जात पात, धर्म, लिंग या क्षुद्र विचारांमध्ये बांधील नव्हते .. ते प्रत्येकाला माणूस म्हणून वागवायचे, त्या मुळे त्यांच्यासाठी एखादा आमदार ही तसाच होता आणि एखादी आदिवासी स्त्री ही ताशीच होती.
आमचा ट्रेन चा प्रवासा एकंदर खूप सुखकर झाला . माझ्यासाठी तर हे सगळं नवल च्या पलीकडचं होतं. वर्ध्याला एकदा पोहचलो. स्टेशन वरील बरीच कर्मचरी सेलिब्रिटी आजोबांना ओळखत होते . त्यांनी आमच्यासाठी लगेच रिक्षा ची सोय केली आणि आम्ही आजोबांच्या माहेरी सुखरूप पोहोचलो
पोहोचल्यावर काय तो आनंद झाला त्यांना. त्यांचा आवाज अजुनच खुलला आणि स्मित अजूनच रुंद झाले. गौतम भाई, उषा दीदी, गीता दीदी, गंगा मा, रमू दीदी ..सगळ्यांना भेटून जणू त्यांचा अनंद गगनात मावेनासा झालेला. आजोबांनी अशा प्रकारे मला सगळी ओळख करून दिली कि असं वाटलंच नाही कि मी तेथे पहिल्यांदा जातीये आणि ह्या सगळ्या लोकांना पहिल्यांदा भेटतीये .
आजोबानी पहिली गोष्ट केली म्हणजे विनोबाजींच्या समाधी खोलीत गेले आणि तब्बल २ तासांनीच परतले . ध्यान करायला गेलेलो म्हणाले. काय संभषण झालं असावं कोण जाणे पण आजोबांच्या चेहऱ्यावर वेगळेच तेज दिसत होते.
नंतरचे आठ दिवस माझ्यासाठी प्रचंड अन्वेषिक , ज्ञानवर्धक , मजेशीर आणि शिस्तबद्द गेले.
आश्रमाचे आणि आजोबांचे वेळापत्रक सांगते ...
पहाटे 4 ला उठणे
पहाटे ४-५ : स्वतः साठी वेळ (आमचे ९३ वर्षाशे आजोबा पहाटे पहाटे एकटे धाम नदी वर फिराला जायचे ह्या वेळेत)
पहाटे ५-६ : एकत्र जमून .. ध्यान, मुद्रा, प्रार्थना (आजोबा हजर )
सकाळी ६-७: स्वयंपाकघर सेवा (नाश्त्याची तयारी - आम्ही ५०-६० जण काही ना काही तरी काम करायचो , आजोबा भरपूर मदत करायचे ..गाणी म्हणत काम कधी व्हायचा कळायचं नाही )
सकाळी ७-८ : नश्ता (एकदम सात्विक , नो मीठ , नो मसाले , नो जास्ती तेल पण तरीही ते पधार्थ रुचकर लागायचे ..आजोबांसाठी खास वेगळा दूध आणि दही असायचं )
सकाळी ८-९ : आश्रम सफाई सेवा (आजोबा झाडू घेऊन पुढे)
सकाळी ९- ११ : श्रम दान (शेती काम ..मी विसरूच शकणार नाही कि ९३ वर्षाच्या आजोबानी "हम भारत के नौजवान " असे गाणी म्हणत म्हणत कसं कुदळ आणि फावडे चालवलेले ..काय तो उत्साह .)
दुपारी 11 - 12: जेवण (जे आश्रमात उगवेल तेच खायचं , मी किती वेग वेगळ्या गोष्टी खाल्ल्या : कलिंगडाच्या सालींची भाजी, कडू लिंबाच्या फुलांची भाजी ..आणि ते फुलं वाचण्यात आणि निवडण्यात भारीच मजा येते )
दुपारी 12 - 4: स्वतः साठी वेळ (अभ्यास, छंद , अन्वेषण , वाचन , भ्रमंती )
दुपारी ४ वाजता : विष्णु सहस्त्रनाम
७- ७.३० : राम रक्षा स्तोत्र वाचन (तेव्हा राम नवमी होती म्हणून एक आठवडा राम रक्षा वाचन होते . आम्ही राम नवमी ला मंदिर सजवले .आजोबांनी जवळ जवळ ४-५ तास मंदिरातली पितळेची भांडी एकनिष्ठेने साफ केली )
संध्याकळी 7: जेवण
संध्याकाळी 7- 8: स्वतः साठी वेळ (आजोबांच्या टाळ्यांची आणि मुद्रा करण्याची वेळ)
8 वाजता: झोपणे
आश्रमा बद्दल आणि तेथील दीदी आणि गौतम भाई आणि तेथील ज्ञानवर्धक वातावरण बद्दल लिहू तेवढं कमी आहे . बघण्यासारखं किंबहुना अनुभवण्यासारखं ठीकाण अहे.
आजोबांबरोबर शॉपिंग व भटकंती
दुपारच्या स्वतः साठीच्या वेळा मध्ये अजोबा मला एक दिवशी सेवाग्राम ला घेऊन गेले
एक दिवस आजोबा गीताई मंदिर ला घेऊन गेले ..बजाज म्युसियम ला घेऊन गेले .. ना उन्हाची चिंता ना तहानेची ची जाणीव ... शेवटच्या दिवशी मग आम्ही खादी भांडार आणि गोशाळेत गेलो.
अश्या प्रकारे ते २०,००० रुपये आम्ही सात्विकतेने खर्च केले
२००० रुपये प्रति किलो देशी गायीचं तूप ... 4 किलो घेतलं : ८००० रुपये
आश्रमासाठी पेळू चं पोतं : १००० रुपये
गायीच्या तुपात बनलेले पेढे परत घेउन जाण्यासाठी : १००० रुपये
2 पेटी चिरखे, पुण्यामध्ये मधे कोणाला तरी दान करायला : 2500 रुपये
आश्रममाला दिले : 2000 रुपये
1000 रुपये ची पुस्तके माला दिली
उरलेले ४००० अशेच कोण्या गरजू साठी (आजोबा आपली बहुतांश पेन्शन अशीच गरजू व्यक्तीं मध्ये वाटून टाकायचे )
दान वीर अजोबा
आजोबा ३ च कुरते घेऊन आलेले. मी जेव्हा परत जाण्यासाठी, सामान बांधत होते तेव्हा 2 च कुरते दिसले . विचारल्यावर वर कळाले त्यांनी एक कुरता, एका गरीब मुलाला दिलेला आणि दुसरा बसला नाही... नाहीतर तो पण देणार होते.
मी तर त्यांच्या कथा ऐकल्या अहेत की एकवेळ तर त्यांनी एका गरीबाला अंगावरचा कुरता काढून' दिलेला आणि स्वतः तसेच घरी अलेले.
म्हणून मला काही जस्ती नवल वाटले नाही.
आजोबांचा पाय निघवत न्हावता आश्रमातून.
सगळ्यांच्या भेटी घेतल्या। निघताना चक्क त्यांच्या डोळ्यात पाणी होते . त्यांच्या ही आणि का कुणास ठाऊक माझ्या ही.
जड मनाने आम्हीं तेथुन निघालो
परतीच्या वेळा पण ट्रेन प्रवास पाहिल्यासारखाच मनोरंजक होता.
तुम्हाला पटणार नही पुण्या मध्ये आल्यावर त्याना कोणतरी सर्वोदय चे कार्यकर्ते घायला आले. नंतर अम्हला आश्चर्याचा धक्का बसला की आमचे ९३ वर्षाचे आजोबा दुचाकी वर डबल सीट बसुन गेले आणि ते पण १/२ तास बसुन.
अम्हला चिंतेत पाहून म्हणाले घाबरू नाका १०० वर्ष जगणार अहे मी आणि प्रत्येकाने १०० वर्षे जगण्याची इच्छा धरावी.
आणि अजबांची ती इच्छा पूर्ण झाली १०० नाही तर १०१ कार्यशील वर्षे जगले. स्वातःसाठी नाही तर जगासाठी. एवढे थोर व्यक्ती आमच्या मधुन निघुन गेले ही आमची कुटुंबाला न भरून येण्यासारखी पोकळी आहे. पण आजोबांचं आयुष्य इतकं उदाहरणार्थ होतं की आपन प्रत्येकजण जर त्यांच्या मधला १% गूण जरी घेऊ शकलो तरी ते जीवंत राहतील .
आपल्याला त्यांना जीवंत ठेवायचंय ... आपल्या विचरणमधे, अपल्य सिद्धांतमधे, अपल्य वागण्यात ,आपल्या कृतित, आपल्या शिस्तीत.
हेच आपला कर्तव्य आहे आणि हीच काळाची गरज आहे.
अजोबा जासे कायम म्हणायचे..
जय जगत
Comments
Post a Comment